Soybean Cotton Anudan : खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाच्या पाच हजार रुपये अनुदानासाठी शेतकऱ्यांना आधार ई-केवायसी (Aadhar eKYC) करणं आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाशी (Soybean Cotton Anudan) संपर्क करून ई-केवायसी करावी, असं आवाहन कृषी विभागांना 26 सप्टेंबर रोजी केलं आहे. 29 सप्टेंबर रोजी अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी.
96 लाख शेतकऱ्यांपैकी 68 लाख शेतकऱ्यांनी आधार संमती पत्र कृषी विभागाला दिले आहेत. पण 25 सप्टेंबर पर्यंतच्या आकडेवारीनुसार 21 लाख शेतकऱ्यांची आधार ई-केवायसी (Aadhar eKYC) अजूनही बाकी असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. शेतकऱ्यांनी आधार ई-केवायसी केली नाही, तर शेतकरी अनुदानापासून वंचित राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी. आता ही ई-केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकता.
Soybean Cotton Anudan Aadhar eKYC
मोबाईल वरून ई-केवायसी नेमकी कशी करायची ?
- तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही गुगल ओपन करा. ओपन केल्यानंतर सर्च मध्ये https://uatscagridbt.mahaitgov.in/ टाईप करा.
- तुमच्या स्क्रीनवर वेबसाईट ओपन होईल.
- वेबसाईट ओपन झाली की कोपऱ्यात तुम्हाला लॉगिन (Login) आणि डिस्प्लेसमेंट स्टेटस (Disbursement Status) असे दोन पर्याय दिसतील.
- त्यातल्या डिस्प्लेसमेंट स्टेटस (Disbursement Status) या पर्यायावर क्लिक करा.
- आता एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
- खाली कॅप्चर चा कोड सुद्धा टाकायचा आहे.
- ऑथेंटीकेशन टाईप (Authentication Type) समोर दोन पर्याय आहेत. एक आहे ओटीपी (OTP) चा आणि दुसरा आहे बायोमेट्रिकचा (Biometric).
- ओटीपी चा पर्याय वरती क्लिक करा. तुमच्या आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवण्यात येईल.
- हा ओटीपी आला की तुम्ही इंटर ओटीपीच्या रकान्यात ओटीपी टाकायचा आहे.
- गेट डाटावर क्लिक करायचंय क्लिक केलं की स्क्रीनवर मेसेज येईल. ओटीपी व्हेरिफाइड सक्सेसफुली त्याच्या खाली ओके वर क्लिक करा.
- तुमची ई केवायसी पूर्ण झाली असेल तर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल.
- त्यामध्ये तुमची पर्सनल माहिती दिसेल जसे की तुमचं नाव, गाव, पीक पाहणी माहिती,गट क्रमांक आणि तुम्हाला क्षेत्रानुसार किती अनुदान मिळणारे त्याची माहिती देखील तुम्हाला इथे पाहता येणारे आहे.
ज्या शेतकऱ्यांना मोबाईल वरून ई-केवायसी करता येणार नाही. अशा शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाला संपर्क करावा. कृषी सहाय्यक (Soybean Cotton Anudan) त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध सुविधा द्वारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातून ई-केवायसी (Aadhar eKYC) करतील.