PM Surya Ghar Yojana : मोफत विजेसाठी रूफटॉप सौरऊर्जा योजना सुरू केली आहे. या योजनेला ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ असे नाव दिले आहे. ही योजना केंद्र सरकारच्या इतर रूफटॉप सौर योजनांपेक्षा किती वेगळी आहे ते जाणून घेऊया. पंतप्रधान सूर्य घर योजनेंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. या योजनेचा लाभ १ कोटी कुटुंबांना मिळणार आहे. या योजनेंतर्गत रूफटॉप सोलर सिस्टीम (Rooftop Solar System) बसविणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदान दिली जाईल.
या योजनेअंतर्गत अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल. याशिवाय, मोठ्या प्रमाणात सवलतीचे बँक कर्ज (Bank Loan) देखील दिले जाईल. लाभार्थ्यांवर खर्चाचा बोजा पडणार नाही याची काळजी केंद्र सरकाने घेतली आहे. सर्व लाभार्थ्यांना राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टलशी जोडले जाईल जे पुढील सुविधा प्रदान करेल. योजना अधिक लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रात रूफटॉप सोलर (Roof Solar) सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
PM Surya Ghar Yojana subsidy
जर एखाद्या कुटुंबाने या योजनेअंतर्गत 1 किलोवॅटची रूफटॉप सोलर सिस्टीम बसवली तर त्या व्यक्तीला 30,000 रुपये, 2 किलोवॅट सिस्टिमसाठी 60,000 रुपये आणि 3 किलोवॅटच्या सिस्टिमसाठी 78,000 रुपये अनुदान दिले जाईल.
सूर्य घर योजनेंतर्गत 2026 पर्यंत 40 हजार मेगावॅट वीज निर्मितीचे (Electric Power) उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना कमी वीज बिल येईल आणि त्यांची वार्षिक 18,000 रुपयांपर्यंत बचत होईल.
Surya Ghar Yojana eligibility
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा (Surya Ghar Yojana) लाभ गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिला जाणार आहे. ज्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी त्यांच्या रिकाम्या छताचा वीज निर्मितीसाठी योग्य वापर करू शकतात. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमुळे इलेक्ट्रिक (Electric Vehicles) वाहनांच्या चार्जिंगमध्येही मदत होईल.
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- वीज बिल
- मोबाईल क्रमांक
- बँक पासबुक
- फोटो
PM Surya Ghar Yojana 2024 Apply Online
- पीएम सूर्य घर योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. https://pmsuryaghar.gov.in/ वर जा
- ‘Apply for Rooftop Solar’ वर क्लिक करा.
- यानंतर विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा.
- यानंतर, वीज ग्राहक खाते क्रमांक आणि मोबाइल क्रमांकाच्या मदतीने लॉग इन करा.
- छतावरील सौर पॅनेलसाठी फॉर्म भरू शकता.
- यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःची आणि घराची सर्व माहिती द्याल.
- तुम्हाला डिस्कॉम कंपन्यांकडून मंजुरी मिळेल.
- नोंदणीकृत विक्रेता कंपन्या तुमच्याशी संपर्क साधतील.
- प्लांट बसवल्यानंतर, तुम्हाला पूर्ण योजना तपशीलांसह सबमिट करावी लागेल.
- तुमच्या जागी नेट मीटर बसवले जातील आणि डिस्कॉम कंपनीच्या तपासणीनंतर तुमचे प्रमाणपत्र पोर्टलवर दिले जाईल.
- तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळेल.
- यानंतर तुम्हाला बँक खात्याची माहिती आणि रद्द केलेला चेक (Cancel Check) पोर्टलवर सबमिट करावा लागेल.
- अनुदानाची रक्कम ३० दिवसांच्या आत तुमच्या खात्यात जमा केली जाईल.