Pan Card Online : पॅन कार्ड कसे तयारकरचे , फक्त 106 रुपयांमध्ये.

Pan Card Online : फोटो आणि सिग्नेचर सह पॅन कार्ड बनवायचे संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत या साठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. चला तर मग सुरु करूया यासाठी आपल्याला कोणतेही कागदपत्रे पाठवण्याची गरज नाही डिजिटल पॅन कार्ड आपल्या ईमेल (EMAIL) वर आणि फिजिकल (physical) पॅन कार्ड आपल्याला घरपोच ( पोस्ट ऑफिस ने ) मिळेल आणि फक्त 106 रुपयांमध्य आपल्या आवडीचा फोटो आणि सिग्नेचर सह पॅन कार्ड बनवण्यासाठी आपल्याला या www.onlineservices.nsdl.com वेबसाईटवर याचे आहे.

त्यानंतर एप्लीकेशन टाईम (Application Type ) मध्ये आपल्याला न्यू पॅन इंडियन सिटीजन (New pan – Indian citizen from 49 A ) या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आणि त्यानंतर कॅटेगिरी (Category)निवडायची – इंडिव्हिज्युअल ( Individual) निवडायची आहे. एप्लीकेशन इन्फोर्मेशन (Applicant information ) – मध्ये टायटल (Title) श्री, श्रीमती, कुमार किंवा कुमारी निवडू शकता. यानंतर आडनाव, पहिले नाव आणि वडीलाचे नाव टाईप करायचे आहे.

त्यानंतर जन्मतारीख, ई-मेल आयडी( Email ID), मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. ट्रम आणि कंडिशन या पर्यायावर टिक करा. व कॅप्चर टाईप करा. सब्मिट ऑप्शन वर क्लिक करा यानंतर आपल्याला एक टोकन क्रमांक दिसेल हा टोकन क्रमांक आपल्याला कुठेतरी लिहून ठेवायचा आहे. किंवा कॉपी करा यानंतर कंटिन्यू टू पॅन एप्लीकेशन (Continue To PAN application ) या वर क्लिक करा यानंतर आपल्या पुढे एक नवीन टॅब ओपन होईल. यानंतर आपल्याला दोन नंबरच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

Pan Card Online

जर आपण एक नंबर च्या पर्यायावर क्‍लिक केले. तर आपल्या आधार कार्ड वर जो फोटो आहे तो प्रिंट घेऊन येईल आणि सिग्नेचर येणार नाही त्यासाठी आपल्याला दोन नंबरच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आपल्याला फोटो आणि सिग्नेचर टाकायचे आहे. त्यासाठी दोन नंबरचा पर्याय निवडा ( लक्षात ठेवा : कि यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल नंबरला आधार नंबर लिंक असायला हवा ) यानंतर थोडे खाली यायचे आहे. यानंतर आपल्याला आधार कार्ड चे शेवटचे चार अक्षर टाइप करायचे आहेत. यानंतर आपल्याला जे आपल्या आधार कार्ड वर नाव आहे. ते नाव टाईप करायचा आहे. त्यानंतर जेंडर ( लिंग) सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या वडिलांचे नाव टाकायचे आहे. यानंतर नेक्स्ट ( next) बटनावर क्लिक करायचे आहे. यानंतर एक नवीन पेज ओपन होईल यानंतर सोर्स ऑफ इन्कम (Source of Income) निवडायचा आहे. यामध्ये आपल्याला नो इन्कम( No Income) पर्याय निवडायचा आहे.

यानंतर आपल्याला आपला कायमचा पत्ता टाकायचा आहे. यामध्ये आपला देश निवडा यानंतर आपल्याला राज्य निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला पिन कोड टाकायचा आहे. यानंतर आपल्याला आपला कंट्री कोड (Country code) टाकायचा आहे. यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आपोआप टाईप झालेला दिसेल यानंतर नेक्सट ( Next) बटणावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्यापुढे एक नवीन विंडो ओपन होईल यामध्ये आपल्याला एरिया कोड, येवो टाईप, रेंज कोड, टाईप करायचा आहे. जर आपल्याला येरीया कोड माहीत नसेल तर आपण गुगलवर सर्च करू शकता. यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे. यामध्ये आपल्याला आयडी प्रुफ, ॲड्रेस प्रुफ, dob प्रुफ, या तिन्ही मध्ये आपण आपलं आधार कार्ड हे निवडायचा आहे. यानंतर डिक्लेरेशन द्यायचा आहे. यामध्ये आपण हिम सेल्फ हार सेल्फ (him selph haar selph) हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर आपल्याला आपल्या गावाचं नाव निवडायचा आहे. Pan Card

Pan Card Online

त्यानंतर आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे फोटो ची साईज 213 × २१३px आणि 200 dp (jpeg) मध्ये स्कॅन करून घ्यायचा आहे. सिग्नेचर ची साईज 2 × 4.5 px आणि 200 dp (jpeg) मध्ये स्कॅन करून घ्यायचा चला तर मग आपण फोटो आणि सिग्नेचर अपलोड करू या त्यासाठी आपल्याला अपलोड फोटो आणि सिग्नेचर या पर्यायावर क्लिक करायचे आहे. choose fill या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. ज्या ठिकाणी आपण आपले फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करून ठेवला आहे त्या ठिकाणी जायचा आहे. त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर ओपन या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्या upload या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर आपल्याला जे आधार कार्ड अपलोड करायचा आहे त्याची साईज 300 kb (pdf) यानंतर आपल्याला आधार कार्ड या पर्यायावर क्लिक करायचे आहे choose fill या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे ज्या ठिकाणी आपण आपले आधार कार्ड स्कॅन करून ठेवला आहे त्या ठिकाणी जायचा आहे त्यानंतर आधार कार्ड सिलेक्ट करायचे आहे सिलेक्ट केल्यानंतर ओपन या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्या upload या पर्यायावर क्लिक करा यानंतर सब्मिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्या पुढे एक पेज ओपन होईल यानंतर आपल्याला आपल्या आधार कार्डाचे पहिले आठ अक्षरे टाईप करायचे आहेत त्यानंतर आपल्याला आपला अर्ज चेक करून घ्यायचा आहे यानंतर प्रोसीड ( prosed) या बटणावर क्लिक करा.

Apply Pan Card Online

यानंतर आपल्याला आपले पेमेंट करून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला पुढे तीन पर्याय दिसतील डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग यानंतर नेट बँकिंग या पर्यायावर क्लिक करायचा आहे आपल्याला या पॅनकार्डसाठी 106 रुपये चे पेमेंट करायचा आहे यानंतर थोडे खाली यायचे आहे आणि ट्रम आणि कंडिशन या पर्यायावर टिक करायचा आहे आणि प्रोसीड टू पेमेंट (Proceed to payment) या टॅबवर क्लिक करा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, क्यू आर कोड, यूटीआय, अशा प्रकारच्या पर्यायाचा वापर करू तुम्ही पेमेंट करू शकता. आपले पेमेंट झाले असा मेसेज येईल. यानंतर कंटिन्यू ( Continue) या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर ट्रम आणि कंडिशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

अथेंतिकेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे ( कारण : आपल्याला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र अपलोड करायचे नाही) यानंतर ओटीपी ऑथेंटिकेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपले आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओटीपी जाईल त्यानंतर हा ओटीपी टाइप करून घेत आहे यानंतर सब्मिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्याला कंटिन्यू विथ साइन या पर्यायावर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहे आपल्या आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे त्या वरती एक ओटीपी जाईल हा ओटीपी टाईप करून व्हेरिफाय ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्या फॉर्मची ई व्हेरिफिकेशन होऊन जाईल यानंतर आपला फॉर्म सब्मिट झालेला आहे त्यानंतर आपल्याला फॉर्म ची पावती आपल्याला सेव करून घ्यायचे आहे.

Leave a Comment