Tax Saving Schemes : प्रत्येक व्यक्तीला कष्टाने कमावलेल्या पैशावर जास्तीत जास्त कर वाचवायचा (Save Tax) असतो. यासाठी कर बचत योजनेमध्ये गुंतवणूक करणे हा सर्वात चांगलं पर्याय आहे. या योजनेअंतर्गत तुमचा कर वाचून तुमचे आर्थिक भविष्य देखील सुरक्षित असेल. आयकर कलम 80C कर वाचवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.
ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर आयकरात सूट दिली जाते. या योजनेमध्ये वर्षातून फक्त एकदाच पैसे भरावे लागतात. त्यानंतर वर्षभर कोणत्याही प्रकारची रक्कम भरायची गरज नाही. सुकन्या समृद्धी योजना (SSY), राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि मुदत ठेव (FD) या योजनांमध्ये नियमित पैसे भरले नाहीत तर खाते बंद होण्याची शक्यता असते आणि हे खाते पुन्हा सुरु करण्यासाठी जास्तीचे चार्ज लागू शकतात.
Tax Saving Schemes
Section 80C :- आयकर कायदा, 1961 चे कलम 80C हे कर बचतीसाठी (Tax Saving) सर्वात लोकप्रिय आयकर कपात आहे. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी केवळ वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी लागू आहे. कॉर्पोरेट संस्था, भागीदारी कंपन्या आणि इतर व्यवसाय कलम 80C अंतर्गत कर सूट मिळविण्यासाठी पात्र नाहीत.
सुकन्या समृद्धी योजना (SSY)
- सुकन्या समृद्धी योजना ही मुख्यतः मुलींसाठी आहे.
- मुलीच्या जन्म तारखेपासून खाते उघडू शकता.
- या योजनेअंतर्गत कमीत कमी रु. 250 रुपये आणि जास्तीत जास्त रु. 1.5 लाख रुपये गुंतवणूक शकतात.
- 8.2% व्याजदर नुसार जी रक्कम मिळेल ती रक्कम आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत टॅक्स वाचवण्यासाठी पात्र असेल.
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)
- राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension System) ही खाजगी, सार्वजनिक आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सरकार-समर्थित बचत योजना आहे.
- 18-60 वयोगटातील सर्व व्यक्तींसाठी सेवानिवृत्ती नंतर वित्त नियोजनसाठी आहे.
- ही योजना विशेष परिस्थितीत 15 वर्षांनंतर पैसे काढण्याची परवानगी देते.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
- कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीचा आणखी एक लोकप्रिय पर्याय म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी.
- तुम्हाला एका आर्थिक वर्षात कमीत कमी रु. 500 आणि जास्तीत जास्त रु. 1,50,000 ची गुंतवणूक करण्यास परवानगी देते.
- आयकराच्या कलम 80C च्या तरतुदींनुसार, तुम्हाला मिळणारे व्याज करमुक्त आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)
- भविष्य निर्वाह निधी, ही एक कर बचत योजना आहे जी फक्त पगारदार कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे.
- प्रतिवर्ष कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता.
- EPF खात्यात असलेल्या रकमेवर वार्षिक 7.1 टक्के व्याज दिले जाते.
मुदत ठेव (Fixed Deposit)
- तुम्ही बँकेत किमान 5 वर्षांसाठी केलेली कोणतीही ठेव 80C अंतर्गत टॅक्स कपातीसाठी पात्र आहे.
- तुम्हाला येथे वारस निवडण्याची परवानगी देते.
- जर तुमचा मृत्यू झाल्यास मुदतपूर्व किंवा मुदतीनंतर ठेव काढू शकेल.
- तुम्हाला हे देखील माहिती असणे आवश्यक आहे की, मुदत ठेवीतून मुदतपूर्व पैसे काढू शकत नाही.